पिंपरीच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा

bpcauthor bpcauthor
2 Min Read

पिंपरी, दि. २० (पीसीबी)
विधानसभा जागा वाटपासाठी महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवार गटाच्या वाट्याला असणाऱ्या पिंपरी विधानसभेची मागणी शिंदे गट करणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी हा दावा केला आहे, यामुळं आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. बनसोडेंच्या बाबतीत मोठी नाराजी आहे, हे पाहता महायुतीचा एक आमदार कमी होऊ द्यायची नाही, म्हणून आम्ही पिंपरीची मागणी करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीत हा मुद्दा मांडतील असा दावा ही बारणेंनी केला आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आमच्याकडे राहावा. या निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची आहे, आमच्याकडे या जागेसाठी सक्षम उमेदवार असल्यामुळे आता ही जागा आम्ही खेचून आणेल असं त्यांनी म्हटलं आहे, तर आण्णा बनसोडेंच्या दाव्यावर म्हणाले, आधी ही जागा आम्ही लढली होती, राष्ट्रवादीच्या उमेदवाराप्रती मतदासंघात नाराजी आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळायला हवा, या मतदारसंघात शिवसेनेचा मोठा मतदार आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना देखील मी सुचित केलं आहे, ही जागा अजितदादांना सुटली तर या प्रश्वावर बोलताना ते म्हणाले, महायुतीतील जे घटक पक्ष आहेत, त्यातील कोणत्याही उमेदवाराला जागा मिळाली तरी आम्ही प्रामाणिकपणे त्याचा प्रचार करू असंही बारणे यांनी म्हटलं आहे.
महायुतीच्या बैठकीत शिंदे गटाने पिंपरी विधानसभेची मागणी केली तरी अजित पवार ही जागा माझ्यासाठी घेणारचं. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंच्या दाव्यानंतर आमदार अण्णा बनसोडेंनी असा प्रतिदावा केला आहे. बनसोडेंबद्दल प्रचंड नाराजी असल्यानं ते पराभूत होतील आणि महायुतीचा एक आमदार कमी होईल. बारणेंचा हा दावा ही बनसोडेंनी खोडून काढला आहे. काहीही झालं तरी मीच पिंपरीमधून महायुतीचा उमेदवार असेन, असं बनसोडेंनी ठणकावून सांगितलं आहे. यानिमित्ताने महायुतीच्या बैठकीत या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक पक्ष महायुतीत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून मी गेली पाच वर्षे काम करत आहे. ज्या पक्षाचे ज्या-ज्या ठिकाणी आमदार अशणार आहेत, त्या ठिकाणी त्या पक्षाला ती उमेदवारी किंवा ती जागा सोडण्यात येणार आहे. पिंपरीसाठी अजित दादा आग्रही असतील असा माझा अंदाज आहे, त्यांना ती जागा सोडायचा निर्णय दादा घेतील असंही त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Share This Article