महालय (पितृ पक्ष) आणि अन्नदान

0
14

दि. १८ (पीसीबी) : – दि.१८ सप्टेंबर २०२४ पासून दि.२ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत महालय पर्वकाल संपन्न होत आहे. आपल्या पूर्वजांचे आपणास सदैव स्मरण असावे तसेच या कालावधीत आपले पूर्वज तर्पणविधी आणि भोजन घेण्यासाठी भूतलावर येतात अशी समजूत असल्याने प्रत्येकजण या काळात ठराविक तिथीस आपल्या पूर्वजांचे तर्पणविधी/श्राद्ध विधी करून त्यांचे नावे अन्नदान करतात. यामुळे आपले माता पिता – पुर्वज समाधानी व तृप्त होऊन संपूर्ण कुटुंबास आशीर्वाद देतात आणि त्यांचे कृपाछत्र सदैव कुटुंबात राहते. ‘देवकर्मापेक्षा पितृकर्म श्रेष्ठ’ असे समजले जाते. त्यामुळे या महालयाच्या कालावधीत अन्नदानास अनन्यसाधारण असे महत्व आहे. श्राद्ध कालावधीत अन्नदान केल्याने देव देवता आणि पितृ गण तृप्त होऊन त्यांना शांती मिळते. त्यामुळे पितृ पक्षात अन्नदान करणे पुण्यदायक आहे

आपणासारख्या परम स्वामी भक्तांच्या उद्दात्त सहकार्यानेच हे अन्नछत्र व्यवस्थित चालत आहे. असेच सहकार्य वृंद्धीगत व्हावे हीच श्री स्वामी समर्थ चरणी विनम्र प्रार्थना.

|| श्री स्वामी समर्थ ||