उच्च शिक्षित आतिशी सिंह दिल्लीच्या मुख्यमंत्री

0
28

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : आपच्या नेत्या आतिशी सिंह दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने निवड झााली असून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आतिशी यांचे नाव सुचवले आबे. आतिशी या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. शिवाय अत्यंत बुद्धीमान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. आतिशी या दिल्लीच्या सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरल्या आहेत .

आतिशी या परदेशात शिकलेल्या आहेत. त्यांनी पदव्युत्तर आतिशी यांचे वडील विजय कुमार सिंब आणि आई तृप्ती वाही दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते. आतिशी यांचे शालेय शिक्षण दिल्लीत झाले आहे. आतिशींचे पूर्ण नाव आतिशी मार्लेना सिंग आहे. मार्क्स आणि लेनिन या नावाचा आधार घेऊन मार्लेना नाव निवडले आहे. मार्लेना नावापेक्षा कामावर चर्चा व्हावी म्हणून 2018 साली त्यांनी आतिशी नाव धारण केले आहे. आतिशी यांच्याकडे जवळपास 1.41 कोटींची संपत्ती आहे. कोट्यवधींची मालकीण असलेल्या आतिशी यांच्याकडे ना स्वत:चे घर आहे ना त्यांच्या नावावर कोणती जमीन आहे. 26 आणि 27 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच अधिवेशन होणार आहे. 2 दिवसांच्या या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार असल्याची माहिती आहे.

कोण आहेत आतिशी ?
आतिशी किंवा आतिशी सिंग या नावानं अधिक परिचित आहेत. दिल्लीतल्या कालकाजी मतदारसंघातून विधानसभेवर त्या विजयी झाल्या.
आतिशी सध्या अर्थ,शिक्षण,सा.बांधकाम,पर्यटन,कला-संस्कृती-भाषा आदी खात्याच्या मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या शिक्षणविषयक सल्लागार म्हणून काम केले. आतिशींचा जन्म 8 जून 1981 चा आहे. वडिलांचे नाव विजय सिंग, आईचे नाव तृप्ता वाही आहे.
आतिशींचे वडील विजयसिंग हे दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर आहेत. आतिशींचे कुटुंब पंजाबी पार्श्वभूमीचे आहे. 2001 ला इतिहास विषयात पदवीधर आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहासात मास्टर्स झाल्यात. 2013 पासून आम आदमी पार्टीची पक्षीय धोरणं ठरवणाऱ्यांपैकी एक
2019 ला लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर यांच्याकडून पराभूत झाल्या. 2020 ला विधानसभा निवडणुकीत 11 हजारहून अधिक मतांनी विजयी झाल्या. मनीष सिसोदियांच्या राजीनाम्यानंतर केजरीवाल मंत्रिमंडळात समावेश कऱण्यात आला. अरविंद केजरीवालांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. केजरीवाल तुरुंगात असताना सरकार व पक्षीय काम चोखपणे सांभाळले.