मोशी भागात भटक्या कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला

0
71

पिंपरी, दि. १५ –
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे लोकवस्तीत भटक्या कुत्र्याच्या टोळक्यांनी थेट चिमुकल्या मुलीवर चावा घेत प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात चिमुकली मुलगी जखमी झाली आहे. शहरात अशा शेकडो घटना रोज घडतात आणि नागरिक वारंवार तक्रार करतात मात्र प्रशासन डोळेझाक करते. निव्वळ निर्बिजीकरण करून पुन्हा त्या कुत्र्यांना रस्त्यावर सोडायचे हा आता पालिकेचा धंदा झालाय, अशी टीका नागरिक करत आहेत.
मोशी येथील क्रिस्टल सोसायटी परिसरात प्रिया विष्णू पाटील ही चिमुकली मुलगी रस्ता क्रॉस करत असताना अचानक आलेल्या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी प्रिया पाटील या चिमुकल्या मुलीवर हल्ला केला, या हल्ल्यात चिमुकली मुलगी जखमी झाली असून यावेळी स्थानिकांनी प्रसंगावधान राखल्याने चिमुकलीचा जीव थोडक्यात बचावला… कचरा कुंड्यांवर मांसाहार करणारी हि कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत असल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने जर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पुढील सात दिवसात केला नाही तर पिंपरी चिंचवड महापालिकेत भटकी कुत्री सोडून असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बोराटे यांनी दिला आहे.