ईद-ए-मिलाद निमित्त पिंपरीतील वाहतुकीत बदल

0
116

पिंपरी, दि. 15 (प्रतिनिधी)

हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त पिंपरी येथे गुरुवारी (दि. 19) मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी शहराच्या विविध भागातून मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत. कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होणार असल्याने पिंपरी परिसरातील वाहतूक गुरुवारी दुपारी दोन ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले आहेत.

प्रवेश बंद – महावीर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने डी मार्ट इन ग्रेड सेपरेटर मार्गे जातील.

प्रवेश बंद – नाशिक फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एचपी पेट्रोल पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इन मार्गे जातील.

प्रवेश बंद – स्व. इंदिरा गांधी पुल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने मोरवाडी चौक मार्गे जातील.

प्रवेश बंद – नेहरूनगर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनी मार्गे जातील

प्रवेश बंद – जय मल्हार खानावळ सम्राट चौक ते मोरवाडी चौक

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने सम्राट चौक ते ऑटो क्लस्टर मार्गे मदर तेरेसा ब्रिज, बसवेश्वर चौक मार्गे तसेच जुना मोरवाडी कोर्ट तसेच केएसबी चौक मार्गे जातील.

प्रवेश बंद – सायन्स पार्क ते मोरवाडी चौक

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने ऑटो क्लस्टर ते मदर तेरेसा ब्रिज तसेच बसवेश्वर चौक मार्गे जातील

प्रवेश बंद – क्रोमा शोरूम ते गोकुळ हॉटेल

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने क्रोमा शोरूम पिंपरी पुलावरून भाटनगर मार्गे जातील

प्रवेश बंद – पिंपरी चौक ते स्व. इंदिरा गांधी पुल

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहने मोरवाडी चौक मार्गे पिंपरी पुलावरून भाटनगर येथून जातील