धक्कादायक ! तोतया पोलिसाने महिला वकिलाला हॉटेलामध्ये बोलावले; कपडे काढायला लावले अन्….

0
90

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : मुंबईमध्ये सायबर गुन्हेगारीची एक घटना घडली आहे. मुंबईत एका महिला वकिलाची ५० हजारांची फसवणूक केली. ३६ वर्षी महिला वकिलाला एका प्रकरणात तुमचे नाव असल्याचं सांगितलं. त्याबाबत तिला बुधवारी एक कॉलही करण्यात आला आहे. महिला वकिलाला तिचे नाव ज्या गुन्ह्याच्या प्रकरणात आहे त्याचा तपास करायचं असल्याचं फोन करून सांगण्यात आलं.

त्याची चौकशी ही गोपनीय असल्यानं पोलीस स्टेशनऐवजी तिला इतर ठिकाणी येण्यास सांगण्यात आले. महिलेला पवई इथल्या हॉटेलचा पत्ता देण्यात आला होता. त्याठिकाणी अधिकारी असल्याचं सांगणाऱ्या महिलेनं महिला वकिलाला शरिरावर जखम आहे का? किंवा शस्त्र वगैरे आहे का? हे तपासण्यासाठी कपडे काढण्यास सांगितलं. तसंच खात्यातून ५० हजार रुपये पाठवण्यास सांगितले.

दरम्यान, महिला वकिलाला आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला तेव्हा तिने पवई पोलीस ठाणे गाठले. महिला वकिलाने फसवणूक करणाऱ्यांच्या कॉलला, मेसेजला रिप्लाय दिला नाही. तेव्हा तिचे नग्न फोटो पाठवत आणखी पैशांची मागणी केली. महिलेला फोन करणाऱ्याने आपण TRAIमधून बोलत आहे आणि सीम कार्ड मनी लाँडरिंग प्रकरणात वापरल्याचं सांगत धमकावण्यात आलं.

महिला वकिलाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, पहिल्यांदा फोन आल्यानंतर पवई सायबर सेलमधून दुसऱ्यांदा कॉल केला गेला. आपण पोलीस अधिकारी असल्याचं सांगण्यात आलं. त्याच व्यक्तीने अटक टाळण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्यास सांगितलं. अटकेच्या भीतीने आपण हॉटेलमध्ये रूम बूक केली आणि तिथे गेले. पण जेव्हा फसवणूक होतेय हे लक्षात आलं तेव्हा पोलीस स्टेशन गाठलं. फसवणूक करणाऱ्यांनी याबाबत कुठेही वाच्यता करू नये अन्यथा फोटो व्हायरल करू अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरु आहे.