बनावट हार्पिक, लायझॉल विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल

0
128

वाकड, दि. 13 (प्रतिनिधी)

बनावट हार्पिक, लायझॉल, कोलिन विक्री प्रकरणी वाकड मध्ये एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) दुपारी करण्यात आला.

छोगाराम घिसाराम चौधरी (वय 34, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी चेतन मोतीराम गणात्रा (वय 48, रा. निगडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी याने त्याच्या श्रीराम फ्रेश मार्ट या दुकानामध्ये बेंकीसर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने बनावट हार्पिक, लायझॉल, कोलीन अशी उत्पादने विक्रीसाठी ठेवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी 41 हजार 239 रुपये किमतीचे बनावट उत्पादने जप्त केली आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.