शेअर मार्केटच्या बहाण्याने महिलेची 12 लाखांची फसवणूक

0
116

वाकड, दि 13 (प्रतिनिधी)

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून महिलेकडून 12 लाख 67 हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 17 मे ते सात जून या कालावधीत ताथवडे येथे घडला.

याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9633922437, +8129365311, +447745187600, +918891781220, +917356616211 या क्रमांक धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला एक लिंक पाठवली. त्याद्वारे फिर्यादीस एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेतले. त्यानंतर त्यांना शेअर मार्केट बद्दल माहिती देऊन त्यात गुंतवणूक केल्यास जास्त प्रमाणात रक्कम मिळेल असे आमिष दाखवले. त्यातून महिले कडून 12 लाख 67 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.