वाकड, दि 13 (प्रतिनिधी)
एप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्या आधारे गुंतवणूक करण्यास भाग पाडत एका व्यक्तीची 17 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार एक जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत काळेवाडी येथे घडला.
याप्रकरणी 53 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8512074230 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीस व्हाट्सअप वरून व्हॉईस कॉल केला. शेअर मार्केटमध्ये जास्त प्रॉफिट मिळवून देऊ असे खोटे आश्वासन देऊन त्यांना प्ले स्टोअर वरून Wbssbpro हे एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यावर सतरा लाख 65 हजार रुपये घेऊन त्यांना कोणतीही रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.










































