मनी लॉन्ड्रींची केस असल्याचे सांगत वीस लाखांची फसवणूक

0
54

वाकड, दि 13 (प्रतिनिधी)

महिलेच्या विरोधात मनी लॉन्ड्रींची केस असल्याचे सांगत चौकशीच्या बहाण्याने महिलेकडून 20 लाख रुपये घेत तिची फसवणूक केली. ही घटना 10 सप्टेंबर रोजी रहाटणी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9229469652, 9239040339 क्रमांक धारक अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी महिलेला फोन केला. फोनवरील व्यक्तीने ते मुंबई सायबर सेल येथून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी विरोधात मनी लॉन्ड्रींची केस असल्याचे भासवून त्यांच्याकडे चौकशी करण्याचा बहाणा केला. फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 20 लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.