पुणे शहरात मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद

0
102

पुणे, दि. ११ (पीसीबी) : आज पाच दिवसांच्या पाहुण्याचे म्हणजेच गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर अनेक जण शहर परिसरातील मानाचे गणपती, देखावे पाहण्यासाठी शहरात मोठ्या संख्येने येतात. यावेळी शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाचा आंनद घेता यावा यासाठी आजपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही रस्ते सायंकाळी ५ नंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यासाठी आज(बुधवार)पासून दिंनाक. ११ ते १८ सप्टेंबरपर्यंत मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता हे रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत.

शहरातील मुख्य रस्ते बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

सकाळ, सायंकाळ वाहतुकीस बंद असणारे मार्ग
लक्ष्मी रस्ता (इमजे खान चौक ते टिळक चौक), शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेथे चौक, स्वारगेट), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), टिळक रस्ता (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक). (Pune Traffic Diversion)

अंतर्गत रस्ते राहणार बंद
सिंहगड गरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैया पाक मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलिस चौकी, गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलिस चौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, गुरी नानक पथ ते हमजे खान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ), शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई, मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, या भागांत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. (Pune Traffic Diversion)

कोणते महत्त्वाचे रस्ते असणार बंद?
1) लक्ष्मी रस्ता – (हमजेखान चौक ते टिळक चौक)
पर्यायी मार्ग – हुल्या मारुती चौक उजवीकडे वळून दारूवाला पूल मार्गे, हमजेखान चौक डावीकडे महाराणा प्रताप रोडने घोरपडी पेठ पोलिस चौकी- शंकर शेठ रोडने पुढे जावे. सोन्यामारुती चौक डावीकडे वळून मिर्जा गालीब रोड जंक्शन, (Pune Traffic Diversion)

2) शिवाजी रस्ता – (गाडगीळ पुतळा चौक ते केशवराव जेये चौक, स्वारगेट)
पर्यायी मार्ग – शिवाजीनगर- स्वारगेटकडे जाताना स. गो. बर्वे चौक- जेएम रोड- अलका चौक टिळक रोड, शास्त्री रोडने सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख बोल्हाई चौकमार्गे नेहरू रोडने पुढे. कुंभारवेस चौक : पवळे चौक, साततोटी चौक, उजवीकडे देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रोडमार्गे घोरपडी पेठ पोलिस चौकी, उद्यान, झगडे आळी ते शंकर शेठ रोड. दुचाकी वाहने गाडगीळ पुतळा, लालमहलपर्यंत सोढण्यात येतील, तेथून दुचाकीस्वारांनी डावीकडे फडके हौद चौकमार्गे दारूवाला पूलमार्गे पुढे इच्छितस्थळी जावे.

3) बाजीराव रस्ता – (पूरम चौक ते एबीसी चौक)
पर्यायी मार्ग – पूरम चौक, टिळक रोडने टिळक चौक उजवीकडे वळून केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौक,

4) टिळक रस्ता – (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौका
पर्यायी मार्ग – जेधे चौक, नेहरू स्टेडियम समोरील एकेरी मार्गान जमनलाल बजाज पुतळा उजवीकडे वळून पूरम चौक व हिराबाग.