मोठी बातमी! पुण्याला जोडला जाणार समृद्धी महामार्ग; 53 किलोमीटरचा हा उड्डाणमार्ग शिरुरपर्यंत पोहचणार,

0
45

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय


पुणे दि. ९ (पीसीबी) : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विदर्भात जाण्यासाठी प्रमुख मार्ग असणारा समृद्धी महामार्ग हा पुण्याला जोडला जाणार आहे. पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला 53 किमीचा सहा पदरी उड्डाण मार्ग हा अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील केसनंद गावामधून या उड्डाणमार्गाला सुरुवात होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. पुणे – शिरूर – अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने नव्या सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच 53 किलोमीटरचा हा उड्डाणमार्ग शिरूरपर्यंत पोहचणार आहे . त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे .

या महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर इतकी असणार आहे. पुणे – शिरूर – अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर हा सहा पदरी उड्डाण मार्ग तयार केला जाणार आहे. प्रस्तावित उड्डाणमार्ग पुढे अहमदनगर व पुढे छत्रपती संभाजी नागरमार्गे समृद्धी महामार्गाला देखील जोडले जाणार आहे.