शहरातील २७ घाटांवर गणेश विसर्जनाची तयारी

0
35

पिंपरी, ,दि 0 ९ (पीसीबी)

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील इंद्रायणी, मुळा आणि पवना नदीवरील २८ घाटांवर गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. पालिकेकडून प्रत्येक घाटावर जीव रक्षक तसेच लाईफ जॅकेट, रिंग, बोट, मेगाफोन, दोरी अशी आवश्यक सर्व साधने पुरविण्यात आली आहेत.

शहरात उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता तयारी सुरू झाली आहे. प्रशासनाकडून नदीकिनारी असलेले घाट तसेच इतर ठिकाणी विसर्जनाची सुविधा करण्यात आली आहे. नदीतील पाण्यात विसर्जन न करता कृत्रिम हौदांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शहरातील २७ ठिकाणी विसर्जनाची तयारी

किवळे घाट, रावेत घाट, रावेत भोंडवे वस्ती मळेकर घाट, पुनावळे गाव स्मशान घाट, ताथवडे स्मशान घाट, वाल्हेकर वाडी जाधव घाट, प्राधिकरण तळे गणेश तलाव, थेरगाव पूल नदी घाट, मोरया गोसावी घाट, केशवनगर चिंचवड घाट, पिंपरी स्मशानभूमी घाट, सुभाष नगर घाट पिंपरी, काळेवाडी स्मशान घाट, काटेपिंपळे घाट क्रमांक एक, पिंपळे गुरव घाट, पिंपळे निलख घाट, वाकड गावठाण घाट, कस्पटे वस्ती घाट, सांगवी स्मशानभूमी घाट, सांगवी दशक्रिया घाट, सांगवी वेताळ बाबा मंदिर घाट, कासारवाडी स्मशानभूमी घाट, फुगेवाडी स्मशानभूमी घाट, बोपखेल घाट, चिखली स्मशान घाट, मोशी नदी घाट, मोशी खान या ठिकाणी विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.

या घाटांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अग्निशमन दलाच्या पथकांना नेमण्यात आले आहे.