गणेशोत्सवात शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात

0
91

पिंपरी, दि. ७ : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. ७ ते १७ सप्टेंबर या दरम्यान श्री गणेशाचे आगमन ते विसर्जन या कालावधीत कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत, यासाठी पोलीस सज्ज राहणार आहेत. ध्वनी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या सूचनाही पोलिसांनी गणेश मंडळांना केल्या आहेत.

गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेने पार पाडावा, कोणताही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निमार्ण होऊ नये, यासाठी या कालावधीत पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. एक पोलीस सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, ११ सहायक पोलीस आयुक्त, ५३ पोलीस निरीक्षक, २४५ सहायक पोलीस निरीक्षक आणि फौजदार, २३३८ पोलीस अंमलदार, ५५० होमगार्ड, एक एसआरपीएफ कंपनी, बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथक, ११ आरसीपी स्ट्रायकिंग एवढा बंदोबस्त सज्ज राहणार आहे.