उघड्यावर राडारोडा टाकल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
76

पिंपरी,दि.५ (पीसीबी)

बांधकामाचा राडाराडा उघड्यावर टाकल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने ही कारवाई 2 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारती शेजारी चिंचवड येथे केली.

मंगेश भाऊसाहेब तिखे (रा. शिंदे वस्ती, रावेत), अजित बारणे (रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील पाटील हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ अभियंता पदावर काम करतात. ते त्यांच्या पथकासोबत 2 सप्टेंबर रोजी शहरात गस्त घालत असताना चिंचवड येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारती शेजारी असलेल्या खदानित मंगेश तिखे हा त्याच्या ताब्यातील डंपर मधून बांधकामाचा राडारोडा टाकत होता. त्याला स्वप्नील पाटील यांच्या पथकाने अडवले. त्यानंतर त्याने पाटील यांच्या पथकाशी वाद घालून गाडीची चावी काढून निघून गेला. त्यानंतर हायवा मालक अजित बारणे याच्याकडून चावी मागवून घेत संपूर्ण राडारोडा मोशी येथील कचरा डेपो मध्ये नेण्यात आला. आरोपींनी आरक्षित भूखंडावर व खदानीमध्ये राडारोडा टाकून सार्वजनिक उपद्रव केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.