स्मार्टफोन स्लो होतोय? तर ‘हे’ नक्की करा, होईल ‘सुपरफास्ट’

0
60

नवी दिल्ली, दि. ०५ (पीसीबी) : सध्या स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. त्यानुसार, अनेक फोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण याच स्मार्टफोनचा जास्त वापर झाल्यास कालांतराने हा फोन स्लो होण्याची समस्या अनेकांना सतावत असते. तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर आम्ही तुम्हाला काही सोपी ट्रिक सांगणार आहोत. ती केल्यास तुमचा स्लो झालेला फोन ‘सुपरफास्ट’ होऊ शकतो.

फोनमध्ये आउटडेटेड सॉफ्टवेअर असेल तर ते तातडीने अपडेट करा. जेणेकरून तुमचा फोन अधिक चांगला चालू शकेल. अनेकदा बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स भरपूर डेटा वापरतात, ज्यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो. डेटा वाचवण्यासाठी आणि इंटरनेटचा स्पीड सुधारण्यासाठी तुम्ही वापरत नसलेले ॲप्स बंद करा. VPN मुळे इंटरनेटचा स्पीड कमी होतो, असा एक सामान्य समज आहे. मात्र, काहीवेळा यामुळे तुमचा इंटरनेटचा वेगही वाढू शकतो.

VPN तुमचा डेटा एन्क्रिप्ट करून आणि सुरक्षित सर्व्हरद्वारे रूट करून कनेक्शन स्थिर आणि फास्ट करू शकतो. याशिवाय, तुमच्या नेटवर्कचा स्पीड कमी असल्यास, सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट किंवा मोबाईल नेटवर्कसारख्या दुसऱ्या नेटवर्कशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने तुम्हाला समस्या तुमच्या फोनमध्ये आहे की नेटवर्कमध्ये हे कळू शकेल.