दोन कोटींच्या खंडणीसाठी तोतया पोलिसांनी केले तरुणांचे अपहरण

0
76

पिंपरी, दि.४ (पीसीबी)

दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी तोतया पोलिसांनी दोन तरुणांचे अपहरण केले. ही घटना 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास जांबे येथे घडली.

योगेश विश्वास सावंत (वय 34, रा. राऊतनगर, अकलूज, जि. सोलापूर) आणि ज्ञानेश्वर विलास घाडगे (वय 26, रा. मगरवस्ती खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुभम यशवंत कुलकर्णी (वय 21, रा. लिगसी मिलिनिया सोसायटी, गायकवाडनगर, पुनावळे) यांनी मंगळवारी (दि. 3) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अभ्युदय चौधरी हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी कारमधून आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. तसेच आरोपींनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवत दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. आरोपींनी आरोपींनी 50 हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, एक लाख 25 हजार रुपये किंमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 15 हजारांचे घड्याळ असा ऐवज मारहाण करून काढून घेतला. फिर्यादी यांना मारहाण करून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे सोडून दिले. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.