ज्‍येष्‍ठाने केला विवाहितेचा विनयभंग

PCB Admin
1 Min Read

पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी)

एका ज्‍येष्ठ नागरिकाने घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. १) रात्री आठ वाजताच्‍या सुमारास राहुलनगर, निगडी येथे घडली.

दिलीप पुनाजी कोकणी (वय ६५, रा.रुपीनगर, तळवडे) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३० वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. २) याबाबत निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार रविवारी रात्री आठ वाजताच्‍या सुमारास आरोपी दिलीप कोकणी हा फिर्यादी विवाहितेच्‍या घरात घुसला. तुला एक विचारू का, आपल्‍या दोघांचे जमेल का, तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, तू फक्‍त हो म्‍हण, असे म्‍हणत विवाहितेशी लगट करीत तिचा विनयभंग केला. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Share This Article