उसने दिलेलले पैसे परत मागणे पडले महागात

0
72

चिंचवड, दि. ०३ (पीसीबी) : उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. १) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

नागेश बाबू राठोड (वय 37, रा. इंदिरानगर, चिंचवड स्‍टेशन) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी रविवारी (दि. 1) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेजस उर्फ बबलू दिगंबर शिंदे (वय 29) आणि दीपक राम मोरे (वय 48 दोघेही रा. इंदिरानगर, चिंचवड स्टेशन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे साई उद्यानाजवळ, संभाजीनगर, चिंचवड येथे आले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी तेजस आणि दीपक यांनी फिर्यादी नागेश यांनी आरोपींना दिलेले उसने पैसे परत मागितले. तसेच आरोपी दीपक याच्या बहिणीला एसआरए स्कीममधून घर मिळण्यास आडकाठी का करतो? असे म्हणत तुला आज बघून घेतो, अशी धमकी दिली. आरोपी दीपक याने फिर्यादी नागेश यांना पकडून ठेवले तर आरोपी तेजस याने कोयत्याने फिर्यादी नागेश यांच्या डोक्यात वार केले. हा वार चुकवण्यासाठी नागेश यांनी डोक्यावर हात ठेवल्‍यामुळे पाच ते सहा वार त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ व तीन वार पाठीवर करीत नागेश यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हातातील लोखंडी कोयता हवेत फिरून जमलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.