कात्रजचे नवीन खवा मोदक बाजारात

0
98

पुणे, दि. ३१ (पीसीबी) : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने या गणेश उत्सवासाठी खवयांच्या मोदकाची शृखंला बाजारामध्ये आणली आहे. यामध्ये खवा मोदक २०० ग्रॅम पॅकिंगची किंमत १४०/-, मँगो मोदक २०० ग्रॅम पॅकिंग १५०/- व चॉकलेट मोदक २०० ग्रॅम पॅकिंग १५०/- रु. अशा किफायतीशीर दरामध्ये आणले आहे. पुर्ण शुध्द असलेल्या मोदकामध्ये कोणतेही प्रिझव्हेटीव्ह पदार्थ वापरलेले नाहीत. तसेच ३० दिवस त्याची टिकण्याची क्षमता आहे. तसेच ११ व २१ च्या पॅकिंगमध्ये ग्राहकांसाठी मोदक उपलब्ध केलेले आहेत.

या लॉन्चिंग प्रसंगी संघाचे चेअरमन श्री. भगवान पासलकर यांनी सांगितले की, पुण्यातील चोखंदळ ग्राहकांसाठी कात्रज डेअरीने विनाभेसळ प्रिझव्हेटीव्ह विरहित मोदक बाजारात आणले आहेत. गणेशउत्सवाच्या कालावधीमध्ये परराज्यातून येणारा खवा वापरुन ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून कात्रज डेअरीने आणलेल्या विनाभेसळ मोदकाचा लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवावा असे सांगण्यात आले. नविन फ्लेवरचे कात्रज मोदक लॉन्चिंग प्रसंगी संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संघाचे सर्व संचालक उपस्थित होते.