पुण्यातील प्रसिद्ध शिवगर्जना ढोल, ताशा,ध्वज पथकाचा महिलांवरील होणाऱ्या वाढत्या अत्याचाराचा जाहीर निषेध!!

0
103

पुणे, दि. २८ (पीसीबी) : पुण्यातील प्रसिद्ध शिवगर्जना ढोल, ताशा,ध्वज पथक, जे ढोल ताशा संस्कृती आणि महिलांच्या सहभागासाठी ओळखले जाते, ज्यांनी भारतात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

या पथकाने या वाढत्या गुन्ह्यांविरोधात त्वरित कारवाईची मागणी केली आहे. आहे. पथकाचे प्रमुख ललित पवार म्हणाले, “शिवगर्जना हे पथक पुरुष आणि महिलांच्या समान सहभागाच्या उद्देशाने स्थापन झाले. यंदा महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी आम्हाला दु:खी केले आहे आणि या विकृत मानसिकतेविरोधात उभे रहाण्याची हीचं योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते. या गणेशोत्सवात शिवगर्जना पथकाच्या फलकांवर संदेश घेऊन चालेल.”

शिवगर्जनाच्या या पावलाने त्यांच्या सामाजिक कारणांप्रती असलेल्या कटिबद्धतेचा दाखला दिला असून, त्यांच्या व्यासपीठाचा वापर सुरक्षित आणि समानतेच्या समाजासाठी केला जात आहे.