मालवण येथील पुतळा कोसळण्याच्या घटनेला महाराष्ट्र सरकारच दोषी – मराठा क्रांती मोर्चा

0
23

फडवणीस यांना फसवणूक भूषण पुरस्कार द्यावा- आंदोलकांची मागणी

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विश्वभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फूट उंचीचा पुतळा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उभारला होता. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीत सदर पुतळा केवळ तीन महिन्यात तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केले होते.
सदर पुतळा बनवण्याचे काम जयदीप आपटे या युवा अनुभव नसलेल्या शिल्पकारला दिले होते. तरी सदर कामी आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा शिवप्रेमींना संशय आहे.आपल्या देशात गेल्या १०० वर्षात महाराजांचे शेकडो पुतळे उभारले आहेत. यातील एकही पुतळा आजवर पडला नाही परंतु वरील पुतळा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने घाईगडबडीत उभारला तो आठ महिन्यातच कोसळला. यामुळे शिवप्रेमीं मध्ये तीव्र संताप निर्माण झाला गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील लाखों शिवप्रेमी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत.

पिंपरी चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवार दिनांक २८ रोजी सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मानव कांबळे,प्रकाश जाधव,कामगार नेते काशिनाथ नखाते,जिवण बोराडे,मीरा कदम सुनिता शिंदे,सिद्दिकभाई शेख, मच्छिंद्र चिंचोळे,मोहन जगताप, अजय भोसले,गोरख पाटील राहुल शिंपले,यांनी निषेध व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार मंत्री दीपक केसरकर व मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्रात व देशात महिला व लहान मुलींवर दररोज विविध ठिकाणी अत्याचार बलात्कार व हत्या होत आहेत. या गुन्हेगारावर सरकार कडक कारवाई न करता चालढकल करत आहे हा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अपमान आहे यावर तातडीने कारवाई करण्याचे सोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारण करू नका असा आंदोलकांना दम देत आहेत.महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करत आहेत याविषयी फडणवीस यांचा निषेध करून आंदोलकांच्या वतीने देशातील पहिला फसवणूक भूषण पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात यावा अशी मागणी
यावेळी करण्यात आली.

सर्व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.या आंदोलनास सतीश काळे,रावसाहेब गंगाधरे,गणेश दहिभाते,वैभव जाधव,अंकुश काळे पाटिल,चंद्रकांत लोंढे, सचिव भिसे,सुलभा यादव,स्मिता म्हसकर,नकुल भोईर,रवींद्र चव्हाण,वसंत पाटील,दीपक केमसे,किरण खोत,ब्रह्मानंद जाधव,सचिन पवार,राजन नायर,दिनेश मराठे,संदीप मुटकुले,शशिकांत आवटी,जितेंद्र जुनेजा,राजश्री शिरवळकर,सुभाष साळुंखे, बाळासाहेब वाघमारे,मंगेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या आंदोलनाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी केले होते.