छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुत्राचे थेट कनेक्शन, एसआयटी चौकशीची मागणी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उद्घाटनानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. यावरून विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात कोट्यवधी रुपये खाल्ले. हे ठाणे कनेक्शन आहे. कंत्राटदार सर्व गायब आहे. मुख्यंत्र्याच्या मुलाला विचारा कंत्राटदार कुठे आहे. मुख्यमंत्र्याच्या मुलाला विचारा आपटे कुठे आहे, असं म्हणत राऊतांनी श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला आहे.

खासदार नारायण राणे यांच्यावरही संजय राऊतांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या काळात पूल कोसळला. त्यात दीडशे लोक मेले. त्यावर बोला म्हणावं. नारायण राणे तुम्ही खासदार आहात. तुम्ही मराठी माणूस आहात. तुम्ही तरी विचार करून बोला. कुणाची बाजू घेत आहात. हे जर कोणत्या राज्यात झालं असतं तर नारायण राणे आणि त्यांची मुलं नागडी नाचली असती. तुमच्या राजवटीत भ्रष्टाचार झाला. तुम्ही खासदार आहात. तुम्ही शिवभक्त असाल तर रस्त्यावर उतरायला हवं होतं. या कामात पैसे खाल्ले. महाराजांच्या पुतळ्यात कोट्यवधी रुपये खाल्ले. हे ठाणे कनेक्शन आहे. कंत्राटदार सर्व गायब आहे. मुख्यंत्र्याच्या मुलाला विचारा कंत्राटदार कुठे आहे. मुख्यमंत्र्याच्या मुलाला विचारा आपटे कुठे आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Share This Article