भाजपचा बडा नेता नवीन राजकीय पक्ष काढणार

0
35

झारखंड, दि. २७ (पीसीबी) : पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात ठिकठिकाणी सभा होऊनही भाजपला अपेक्षित असे यश गाठता आले नाही. त्यामुळे याबाबत पक्षात अनेक अर्थाने चर्चा सुरु आहेत. काही महिन्यांवर झारखंडच्या निवडणूका असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राज्यातील समीकरणं बदलली आहेत तर दुसरीकडे भाजपच्या एका बड्या नेत्याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने नव्या पक्षाची स्थापना करण्याचे संकेत देत भाजपचे टेन्शन वाढवले आहे.

भाजपाचे एकेकाळचे वरिष्ठ नेते असलेले माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात परतण्याची तयारी करत आहेत. तसेच यशवंत सिन्हा हे त्यांचा स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्थापन करण्याचा निर्णय हा हजारीबार येथे झालेल्या अटल विचार मंचच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. हजारीबाग येथे अटल विचार मंचची बैठक नुकतीच झाली. प्राध्यापक सुरेंद्र सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र आणि वित्त मंत्रालय सांभाळणारे यशवंत सिन्हा हे ही उपस्थित होते.

अटल विचार मंचच्या बैठकीमध्ये झारखंडमधील सध्याच्या राजकीय परिस्थिती बाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेचा प्रस्ताव संमत करण्यात आला. यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या या पक्षाचे नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या नावावर असेल.