महायुतीच्या निषेधासाठी काळे झेंडे, काळे शर्ट, मुखपट्टी

0
40

महाविकास आघाडीकडून आंबोडकर चौकात धरणे आंदोलन
पिंपरी, दि. २४ –
बदलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज शनिवार दि- २४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी दहा वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
त्या अत्याचारी नराधमास फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये गृहखातं पूर्णपणे झोपलेले असल्याचे दिसून येते. या अत्याचारांच्या घटनांबाबत सरकार अत्यंत असंवेदनशील असून राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. भारतीय संविधान व न्यायव्यवस्था यांचा आदर करणारे आम्ही लोक आहोत, त्यामुळे राज्यव्यापी बंद न करता निषेध आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु या सर्व अत्याचारांच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारने पायउतार व्हावे.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्यासह महिला पदाधिकारी तसेच महाविकास आघाडी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.