आयपीएलचा नफा ५ हजार कोटीं असूनही इनकम टॅक्स भरत नाहीत

0
87

मुंबई, दि. २१ : आयपीएल ही बीसीसीआयसाठी सोन्याची कोंबडी ठरली आहे. आयपीएलने या वर्षी ५ हजार कोटींपेक्षा जास्त नफा मिळवला आहे. पण बीसीसीआयला एवढा बंपर फायदा होऊनही बीसीसीआय मात्र इनकम टॅक्स भरत नाही. एवढ्या जास्त कमाईनंतरही बीसीसीआय इनकम टॅक्स का भरत नाही, याचे एकमेव कारण आता समोर आले आहे.

बीसीसीआयचे पैसे कमावण्याचे साधन काय…
बीसीसीआय ही क्रिकेट विश्वातील सर्वात धनाढ्य संघटना आहे. आयपीएलमधूनच बीसीसीआय हजारो कोटी रुपये कमावते आणि अजून त्यांच्या मिळकतीची बरीच साधनं आहेत. बीसीसीआयचे बचत खाते आहे, त्याचबरोबर फिक्स डिपॉझिटमध्येही त्यांनी पैसे ठेवलेले आहेत. त्यामुळे बीसीसीआयला करोडोंमध्ये व्याज मिळतं. एवढी मोठी उलाढाल बीसीसीआय करत असली ती ते इनकम टॅक्स का भरत नाहीत, याचे कारण आता समोर आले आहे.

बीसीसीआय इनकम टॅक्स का भरत नाही…
जेव्हा आयपीएलची सुरुवात झाली, तेव्हा बीसीसीआयकडे खोऱ्याने पैसा यायला लागला. हा पैसा करोडोंच्या घरात होता. त्यावेळी बीसीसीआय एवढे पैसे कमावते, पण इनकम टॅक्स का भरत नाही, असा प्रश्न चर्चेत आला होता. त्यावर सर्वांना एकच उत्तर मिळाले ते म्हणजे , बीसीसीआयची इनकम टॅक्सच्या १२ A या नियमानुसार धर्मादाय संस्था, अशी नोंदणी करण्यात आली आहे. बीसीसीआय जे पैसे कमावते ते ती खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसारासाठी वापरते. क्रिकेट या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआय आपल्याकडे आलेली मिळकत वापरते. त्यामुळेच बीसीसीआयने जे पैसे आयपीलमधून कमावले आहेत, त्यासाठी त्यांना इनकम टॅक्स भरावा लागत नाही.