हिंजवडी,दि. २१ ऑगस्ट (पीसीबी )
वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देऊन एका महिलेची चार लाख सात हजार 814 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना हिंजवडी येथे जुलै महिन्यात घडली.
याबाबत सात बँक खातेधारकांसह एका अज्ञात मोबाइल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डांगे चौक रोड, हिंजवडी येथे राहणा-या एका 31 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी महिलेला टेलिग्राम गु्रपमध्ये अॅड केले. त्यानंतर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळे टास्क देऊन महिलेची चार लाख सात हजार 814 रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.













































