गरवारे टेक्निकल फायबर्स लि.कंपनीत कामगार संघटनेची निवडणुक

0
81

चिंचवड, दि. २१ ऑगस्ट(पीसीबी) – येथील गरवारे कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणूकीत कामगार विकास आघाडी पॅनल ने घवघवीत यश प्राप्त केले असून या निवडणुकीत अध्यक्षपदी जयवंतराव खाटपे,जनरल सेक्रेटरीपदी सुधीर चिंचवडे, खजिनदार पदी संजीव गायकवाड,उपाध्यक्ष पदी राजू आढाव,व जॉईंट सेक्रेटरी पदी अजय जोशी हे प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत.
कंपनीतील सर्व कामगारांचे तसेच चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील आजूबाजूच्या कामगार वर्गाचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी संघटनेची निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत सुमारे 99 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.


सोमवारी मतदान झाल्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत सुरुवातीपासूनच पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते जसजसा निकाल लागू लागला तसा कामगारांनी जल्लोष करून गुलाल उधळीत आनंद उत्सव सुरू केला या निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे.


सल्लागारपदाच्या तीन जागेसाठी :-
,1) संदीप जगताप 2) कमलाकर गोसावी3) सखाराम तांबे


त्याचप्रमाणे कार्यकारणी सदस्याच्या तीन जागेसाठी:-
1)काळूराम गायकवाड 2) केशव रडे 3) नितीन तारू
हे प्रचंड मताने विजयी झाले.


निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळासाहेब चौधरी,अनिल मोरे, सुरेश पोट व महारुद्र विरपे यांनी काम बघितले.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे संघटनेच्या अध्यक्षपदी जयवंतराव खाटपे यांची सलग पाचव्यांदा भरघोस मतांनी निवड झाली आहे.


या निवडणुकीत कामगार विकास आघाडी पॅनलने पूर्णपणे बहुमत मिळवून एक हाती सत्ता मिळविली.पॅनलच्या या घवघवीत विजयाबद्दल बोलताना,जयवंतराव खाटपे व जनरल सेक्रेटरी सुधीर चिंचवडे म्हणाले,आम्ही नेहमी कामगारांच्या प्रत्येक प्रश्नांना प्राधान्य दिले व कामगार हिताचे महत्वाचे प्रश्न मार्गी लावले त्यामुळेच कामगारांनी आमच्यावर विश्वास टाकला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असेही ते म्हणाले.


सुरवातीपासून निवडणूक प्रक्रिया व्यवस्थीत पार पाडण्यासाठी व्यवस्थापनाचे संपूर्ण सहकार्य लाभले असेही श्री खाटपे व चिंचवडे यांनी सांगितले.