‘लाडक्या बहिणीं’च्या छोट्या मुलीही असुरक्षित – उद्धव ठाकरे

0
41

दि. २० ऑगस्ट (पीसीबी)  मुंंबई –
बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येताच, राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. रेल्वे रोको करण्यात आला. या घटनेनंतर आता विरोधकांनी राज्य सरकारला सुद्धा धारेवर धरले आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. ‘लाडक्या बहिणीं’च्या छोट्या मुलीही असुरक्षित असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
या घटना आली संपूर्ण देशात वारंवार घडतात आणि आपल्याकडे कशी हल्ली पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केले जाते. माझं मत असेल एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आपल्या राज्यात लाडक्या बहिणी आणि या बहिणींच्या लहान मुली असुरक्षित आहेत. त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत. आपण कुठल्यातरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही देशात कुठली अशी घटना घडतात कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून मध्ये फास्टट्रॅक अँड म्हणा किंवा काही म्हणा आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं. निर्भयाचे सगळे आरोपी पकडले गुन्हे साबित झाले पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिले गेले आणि मग या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

एवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात तसंच त्याचा न्याय निवड करून त्याच्यावरती शिक्षा, शिक्षेची अंमलबजावणी करायला सुद्धा जबाबदार धरले पाहिजे हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आणा बसेल तर मी एवढंच म्हणे की अशा घटनेचा राजकारण न करता हातरस, उणाव त्याच्या नंतर राजस्थान मध्ये काय घडलं, आता बदलापूरमध्ये घडलं तर ते सुद्धा कामा नये सगळेजण पक्षभेद जात-पात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील. आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्याची महिला ती माझी बहीण आहे माझी लाडकी बहीण जवळपास तयार झाला होता सर्वाना कल्पने की त्यावेळेला अधिवेशन होते तिथे एक एक दोन दोन दिवसाची होते पण हे बिल आम्ही आणू शकलो नाही कारण आमच्या सरकार गद्दारी करून पाडलं गेलं आज त्यांनी गद्दारी करून ते आमचं सरकार पडलं आणि विधेयक लटकून ठेवलेले त्यांची जबाबदारी आहे, की शक्ती बिलाची शक्ती ही या गुन्हेगारांना दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

ती शाळा भाजपसंबंधीत आहे. मला राजकारण करायचे नाही. मी यामध्ये राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी कोणी राजकारण करु नये, तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला, तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

यापूर्वी आपल्याकडे वरळीला पण एक घटना झाली. हिट अँड रनची, त्यात तो मिहीर शाह होता, त्याने महिलेला फरफटत नेले. आता पुढे काय झालं. का त्याच्याकडून पण निबंध लिहून घेतला? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला. बदलापूरच्या घटनेत भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून पण निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार आहात का? असा संताप त्यांनी व्यक्त केला. आपल्याला राजकारण आणायचे नाही, पण केवळ गुन्हा दाखल झाला आणि निकाल लागला, वर्षोनुवर्षे अंमलबजावणीसाठी प्रतिक्षा करावी लागत असेल तर फायदा काय असा सवाल त्यांनी केला. गुन्हेगारांवर जरब बसली पाहिजे, तर आपण आपल्या बहिणीला लाडकी बहीण म्हणू शकू असे ते म्हणाले.