शेअर मार्केटच्या बहाण्याने कंत्राटदाराची साडेसात लाखांची फसवणूक

0
74

सांगवी, दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे आमिष दाखवून कंत्राटदाराची सात लाख 61 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना पाच मार्च ते चार जुलै या कालावधीत सांगवी परिसरात घडली.याप्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल हेमराजनी, मितेश जैन, सियालिया पांडे, इमली आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन केले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरपूर परतावा मिळवला असल्याचे स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर केले. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना एक लिंक पाठवून एक एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून गुंतवणुकीच्या बहाण्याने सात लाख 61 हजार 864 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.