कॉँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांची अचानक तब्येत बिघडली

0
47

१४ ऑगस्ट (पीसीबी) – नांदेडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नांदेडमधील कॉँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने तातडीने रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. वसंत चव्हाण यांचा अचानक बीपीदेखील कमी झाला आहे.

वसंत चव्हाण यांच्यावर संबंधित रुग्णालयात उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना तातडीने हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता वसंत चव्हाण यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने हैद्राबाद येथील रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

वसंत चव्हाण यांना हैद्राबादला हलवणार
हैद्राबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये वसंत चव्हाण यांना दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्या उपचारासाठी सर्व तयारी केली जात आहे. सध्या वसंत चव्हाण यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर पुढील उपचार आता हैद्राबाद येथे होणार असल्याची माहिती आहे.

नांदेडमध्ये वसंत चव्हाण यांचा लोकसभेत विजय
वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत नांदेडची जागा काँग्रेसला मिळवून दिली. नांदेडमध्ये वसंत चव्हाण यांचा विजय राज्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.