चाकण, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) -मेस मध्ये जेवण करून घरी पायी चालत जात असलेल्या व्यक्तीला भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात आठ ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास चाकण – तळेगाव रोडवर राणूबाई मळा येथे घडला.सचिन शामराव पैठणकर (वय 32, रा. राणूबाई मळा, चाकण. मूळ रा. जालना) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अजय किशोर ससाणे (वय 29, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय यांचा आतेभाऊ सचिन पैठणकर हा राणूबाई मळा येथे मेस मध्ये जेवण करून पायी चालत घरी जात होता. त्यावेळी त्याला भरधाव आलेल्या वाहनाने धडक दिली. यात सचिन पैठणकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर वाहन चालक सचिन यांना रुग्णालयात दाखल न करता तसेच अपघाताची माहिती न देता पळून गेला. दरम्यान सचिन पैठणकर यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.













































