दि. ५ ऑगस्ट (पीसीबी) निगडी,
अॅप डाऊनलोड करून त्या माध्यमातून चोरट्यांनी ऑनलाइन माध्यमातून 65 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 9 ते 23 मे 2024 या कालावधीत यमुनानगर, निगडी येथे घडली.
ब्रिजेश सोमनाथ सालियन (वय 37, रा. यमुनानगर, निगडी) यांनी रविवारी (दि. 4) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्याने एमएएमसीएम या अॅपद्वारे ईएटी ट्रेडिंग अकाऊंटच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करीत फिर्यादी यांच्या खात्यातून 65 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करीत फिर्यादी सालियन यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.










































