व्यावसायिक भागीदाराची फसवणूक केल्या प्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल

0
103

चिंचवड, दि. १ ऑगस्ट (पीसीबी) – बांधकाम साईट मधील सर्व फ्लॅट भागीदाराच्या संमतीशिवाय परस्पर विकून त्यातील पैशांचा अपहार केला. बांधकाम व्यवसायात भागीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खराळेवाडी पिंपरी येथे घडला.

विजया नामदेव पडवळ, नामदेव बबन पडवळ (दोघे रा. लिंक रोड, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शहजाद अख्तर अनिसुद्धिन (वय 51, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यवसाय आहे. त्यांना पिंपरी चिंचवड परिसरात बांधकाम व्यवसाय करायचा होता. सन 2016 मध्ये त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने मे रॉयल बिल्डर यांनी शिवराम हाईट्स, सर्वे नंबर 5244, खराळवाडी, पिंपरी येथे सन 2014 मध्ये बांधकाम सुरू केले आहे. मात्र रॉयल बिल्डर यांचा प्रकल्प दुसऱ्या व्यक्तीला चालवायला द्यायचा आहे. त्याबाबत फिर्यादी यांनी माहिती घेतली असता रॉयल बिल्डरचे भागीदार नामदेव पडवळ आणि विजया पडवळ यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे कोणतेही भांडवल नसल्यामुळे त्यांना नमूद प्रकल्प पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यामध्ये गुंतवणूक केली.

त्याबाबत त्यांनी भागीदारीचा करार केला. यामध्ये वेळोवेळी परिस्थितीनुरुप बदल करण्यात आले. सन 2016 मध्ये पडवळ दाम्पत्याचे प्रत्येकी एक टक्के आणि फिर्यादी यांचे 98 शेअर संबंधित बांधकाम व्यवसायात होते. दरम्यानच्या काळात आरोपींनी संबंधित बांधकाम साईट मधील दहा फ्लॅटची दोन कोटी 77 लाख 3 हजार रुपये यांना अप्रामाणिकपणे विक्री केली. ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. एका फ्लॅटचे बनावट एग्रीमेंट करून देत फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत