शेअर बाजाराच्या नावाखाली 31 लाखांची फसवणूक

0
64

दि. ३१ जुलै (पीसीबी) चिंचवड,
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखवून एका महिलेची 30 लाख 93 हजार 640 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 23 फेब्रुवारी ते 12 एप्रिल 2024 या कालावधीत चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी 47 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 30) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सत्यसिंग (मो.न. 8277604730), माया सलाम (मो.नं.1060042063), अकाऊंट मॅनेजर (मो.न. 8735881977) यांच्यासह एकूण 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसांत संगनमत करून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना पैसे भरण्यास भाग पाडून 30 लाख 93 हजार 640 रूपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.