गावाला जाणे पडले महागात, घरातून सव्वा लाखाची घरफोडी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

30 जुलै (पीसीबी) चिखली,
गावाला जाणे एका व्यावसायीकाला महागात पडले आहे. बंद घराचे कुलुप तोडून सव्वा लाख रुपयांची चोरी करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि.27) चिखली येथे घडली आहे.

याप्रकरणी भरत रावसाहेब पवार (वय 45 रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामानिमीत्त गावी गेले होते. यावेळी चोरांनी घराचे कुलूप तोडून घरातून 9 ग्राम वजनाचे सोने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article