अविनाश कांबीकर दिग्दर्शित “सुलतान”चा वर्ड प्रिमियर जर्मनीमधील 21 व्या भारतीय आतंराराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल मध्ये उत्साहात पार …

0
62

दि. ३० जुलै (पीसीबी) – जर्मनी स्टूटगार्ट – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथेवर आधारित “सुलतान ” या लघुपटाचा वर्ड प्रिमियर नुकताच युरोप खंडातील जर्मनी येथील २१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात उत्साहात पार पडला. यावेळी चित्रपट समीक्षक आणी चित्रपट प्रेमींची विशेष उपस्थिती होती. यावेळी फिल्म फेस्टीव्हलचे संचालक ॲालिव्हर मान, चित्रपट निवड समिती सदस्य थेरेसा हेस, तसेच जर्मन दुतावासातील भारतीय सहकारी अबिन थॅामस, भारतीय चित्रपट समीक्षक तथा दिग्दर्शक संतोष पाठारे इत्यादी मान्यंवर उपस्थित होते.

21 वा भारतीय चित्रपट आतंरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे. 2004 पासून तो दरवर्षी जुलैमध्ये पाच दिवस फिल्मब्युरो बॅडेन-वुर्टेमबर्ग आणी जर्मन दुतावास भारत यांच्या संयुक्त सहकार्याने जर्मनीमधील स्टूटगार्ट येथे आयोजित केला जातो. 

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रेरित असलेल्या कलाकृतींला प्रथमच आतंराराष्ट्रीय मंचावर नेण्याचे काम दिग्दर्शक अविनाश कांबीकर आणी त्यांच्या टिमने केले असून ब्लॅक हॅार्स मोशन ह्या चित्रपट निर्माती संस्थेने या लघुपटाची निर्मीती केली असून सहनिर्माता विजय क्षीरसागर आहेत. सुलतानच्या माध्यामातून पिंपरी चिंचवड शहराचे नाव युरोपमध्ये झळकावण्याचे काम दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांनी केले असून त्यांनी आपल्या कार्याव्दारे पिंपरी चिंचवड शहराची मान उंचावली आहे.

यावेळी समिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना दिग्दशर्क अविनाश कांबीकर म्हणाले की ज्या मार्क्सवादाचा अण्णा भाऊंच्या जीवनावर प्रभाव होता त्याच मार्क्सच्या जन्मभूमीवर त्यांचे विचार जर्मनील प्रेक्षकांसमोर मांडताना खुप अभिमान वाटतो. सुलतान च्या माध्यामातून जर्मनीतील जर्मन तथा भारतीय प्रेक्षकांना 1960 काळ अनूभवता आला. तसेच सुलतानला जर्मन स्टार ॲाफ इंडियाचे नामाकंन मिळाल्याचे समाधान वाटते.

तसेच यावेळी बोलताना चित्रपट समीक्षक संतोष पठारे म्हणाले की “सुलतान “ हि अण्णा भाऊंची कथा दर्जेदार असून संपुर्ण विश्वाला आपली वाटणारी आहे. दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांनी खुप छान प्रकारे अण्णा भांऊच्या साहित्याला न्याय दिला असून त्यांचे विचार चित्रपटाच्या माध्यामातून खरया अर्थाने जगासमोर मांडणाचा प्रयत्न केला आहे.