बँकेतून बोलत असल्याचे सांगत एक लाखाची फसवणूक

0
179

चिंचवड, दि. 26 (जुलै (पीसीबी) – बँकेतून बोलत असल्याचे सांगत एका व्यक्तीला एक लाखाचा गंडा घालण्यात आला. ट्रॅव्हलिंग आणि नवीन क्रेडिट कार्डची ऑफर असल्यास सांगत व्यक्तीला ओटीपी शेअर करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना चार जून ते तीन जुलै या कालावधीत वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.याप्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. ट्रॅव्हलिंग आणि नवीन क्रेडिट कार्डची ऑफर आहे, असे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ओटीपी शेअर करण्यास सांगून त्याद्वारे एक लाख 5 हजार 914 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.