राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी मधील वाहतुकीत बदल

0
143

हिंजवडी, दि. 26 जुलै (पीसीबी) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लवळे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठात 29 जुलै रोजी येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्या दरम्यान मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दौरा मार्गातील वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिले आहेत.मौजे नांदेगाव- सनीजवर्ल्ड व सुस मार्गे पुणे मार्गावरील सर्व प्रकारची हलकी, जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद केली असून या मार्गावरील वाहतूक नांदेगाव-माले येथून हिंजवडी मार्गे पुणे तसेच नांदेगाव-पिरंगुट-चांदणी चौक मार्गे पुणे अशी वळविण्यात आलेली आहे.

तरी नागरीकांनी मौजे नांदेगाव सनीजवर्ल्ड व सुस मार्गे पुणे बाजुकडे न जाता त्यांनी नांदेगाव- माले येथून हिंजवडी मार्गे पुणे तसेच नांदेगाव-पिरंगुट-चांदणी चौक मार्गे पुणे या पर्यायी मार्गाचा वापर करावा. 29 जुलै रोजी मध्यरात्री 12 ते दुपारी चार वाजेपर्यंत हा बदल असणार आहे.