सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा

0
84

चाकण, दि. 26 जुलै (पीसीबी) – सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. 25) मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे घडली.अनिल राम नेपाली (वय 31, रा. मेदनकरवाडी, चाकण), कृष्णा टेकथापा मगर (वय 24, रा. चाकण), रोकडेश्वर वसंतराव जाधव (वय 25, रा. नाणेकरवाडी), अमर महेश देशमुख (वय 18, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार उत्तम घनवट यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार उत्तम घनवट हे मार्शल ड्युटीवर असताना पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे चौघेजण आपसात झोंबाझोंबी करत असल्याचे त्यांना दिसले. आरोपी मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करत होते. याबाबत घनवट यांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.