न्यायालयात खोटा जबाब देण्यासाठी साक्षीदारावर दबाव

0
109

भोसरी, दि. 26 जुलै – न्यायालयात दिलेला जबाब खोटा असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दे नाहीतर तुला जगू देणार नाही, असे म्हणत आरोपीने साक्षीदारावर खोटा जबाब देण्यासाठी दबाव आणला. ही घटना 22 जुलै रोजी सकाळी बापू काटे चाळ, दापोडी येथे घडली.अतुल भीमराव खंडागळे (वय 38, रा. रापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिरोज उर्फ बा दिलावर शेख (वय 42, रा. दापोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख याने फिर्यादी खंडागळे यांना फोन केला. ‘तू पोलिसांना व न्यायालयात माझ्या विरोधात जबाब दिला. त्यामुळे माझ्या मुलाला व पत्नीला जामीन झाला नाही’, असे म्हणून ‘तू पोलिसांना आणि न्यायालयात दिलेला जबाब खोटा दिला आहे असे मला प्रतिज्ञापत्र लिहून दे. नाहीतर मी तुला गुन्ह्यात अडकवून टाकेल व तुझे पण नाव घेईन. तसेच मी सुटल्यावर तुला जगू देणार नाही’ अशी आरोपीने दमदाटी केली. फिर्यादी खंडागळे हे संबंधित गुन्ह्यात महत्त्वाचा साक्षीदार असल्याने आरोपीने त्यांना जबाब बदलवण्यासाठी दबाव टाकला. भोसरी पोलीस तपास करीत आहे.