शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

0
445

महाळुंगे,पिंपरी, दि २२ जुलै (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 20) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास महाळुंगे गाव येथे करण्यात आली.

भोलूकुमार राजबली महातो (वय 20, रा. महाळुंगे गाव, ता. खेड. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी लोखंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोलूकुमार याने त्याच्याकडे शस्त्र बाळगले असल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुरा, लोखंडी टॉमी व गज जप्त केला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.