बस प्रवासात एक लाखाचे मंगळसूत्र पळवले

0
141

१९ जुलै (पीसीबी) पिंपरी,
पीएमपी बस प्रवासात प्रवासी महिलेचे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 18) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास फिनोलेक्स चौक पिंपरी ते एम्पायर इस्टेट चिंचवड या दरम्यान घडली.

याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पीएमपी बसमधून फिनोलेक्स चौक पिंपरी ते एम्पायर इस्टेट चिंचवड या दरम्यान प्रवास करत होत्या. अवघ्या काही मीटरच्या प्रवासात अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र कापून चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.