शेअर्स खरेदी विक्रीचा ॲपवरून नागरिकाचे 29 लाख रुपयांची फसवणूक

0
56

१९ जुलै (पीसीबी) वाकड,
शेअर्स खरेदी-विक्री करणाऱ्या एका ऑनलाइन ॲपवरून नागरिकाचे 29 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे 11 डिसेंबर 2023 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत मोबाईल द्वारे घडली.

याप्रकरणी 43 वर्षीय नागरिकाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी शिवकुमार सहगल, कार्तिक कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एल आर ओ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या नावाचे फेसबुक वर एक पेज दिसले. त्यावर पोस्टवररील नंबर वर संपर्क साधला असता ग्रुप मध्ये आरोपीने ऍड केले. त्यानंतर शेअर मार्केट खरेदी विक्रीचे ऑनलाईन क्लास सुरू करून त्यामध्ये खरेदी विक्री करण्याच्या ॲप बद्दल माहिती दिली. फिर्यादी व इतरांचा विश्वास संपादन करून संबंधित ॲप मोबाईल मध्ये घ्यायला सांगितले व त्याद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये फिर्यादी यांच्याकडून 29 लाख 35 हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र त्यानंतर कोणताही नफा किंवा मुद्दल फिर्यादी यांना परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.