मुंबई-बेंगलोर महामार्गावर भरधाव वाहनाची पादचाऱ्यास धडक

0
81

हिंजवडी, दि. 16 जुलै (पीसीबी) – मुंबई-बेंगलोर महामार्गावर हिंजवडी येथे एका वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीला जोरात धडक दिली. त्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 15) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.

मारुती कुंडलिक दुधमल (वय 48, रा. पाटीलवस्ती, बालेवाडी, पुणे. मूळ रा. परभणी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बुद्धरत्न मारुती दुधमल (वय 26) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुद्धरत्न यांचे वडील मारुती दुधमल हे मुंबई-बेंगलोर महामार्गावर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच घटनेची माहिती न देता पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.