चिखली मध्ये स्वयंघोषित बारक्या भाईची दहशत

0
128

चिखली, दि. 14 जुलै (पीसीबी) – चिखली मधील भाजी मंडई जवळ स्वयंघोषित बारक्या भाईने एका व्यक्तीला मारहाण करत दहशत पसरवली. ही घटना 11 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

अतुल गणपत बनसोडे (वय 38, रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बारक्या व त्याच्या सोबतचे दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामावरून घरी जात असताना आरोपी रिक्षा मधून आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी यांनी देखील आरोपींना शिवीगाळ केली. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस ‘तू आम्हाला शिवी दिली. तू बारक्या भाईला ओळखत नाही का’ असे म्हणून मारहाण केली. ‘तू आम्हाला ओळखतो तरी शिवीगाळ केली. तुला आता जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून फिर्यादी यांच्या डोक्यात कोयता मारला. मात्र फिर्यादी यांनी तो वार चुकवला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून ‘पुढे तू बारक्या भाईला नडलास तर बघ’ असे म्हणत धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.