टेस्टमध्ये कमी मार्क मिळाल्याने ‘त्याने’ मारली सातव्या मजल्यावरून उडी

0
65

सांगवी, दि. 14 जुलै (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथील रोजलँड सोसायटीत एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरू 14 वर्षाच्या मुलाने उडी मारल्याची घटना रविवारी (दि. 13) घडली. मुलाला टेस्टमध्ये कमी मार्क मिळाल्याने आई बोलली म्हणून त्याने हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपसात समोर आले आहे.

मल्हार मकरंद जोशी (वय 14) असे त्या मुलाचे नाव आहे.

मल्हार जोशी हा 9 व्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील काल एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे तो आपल्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. तेव्हा घराच्या गॅलरीतून उडी मारली. त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हार जोशी याची शाळेमध्ये मागील आठवड्यात एक चाचणी परीक्षा झाली होती. त्यामध्ये त्याने अपेक्षित गुण मिळतील असे सांगितले होते. दरम्यान, शनिवारी त्याच्या चाचणीचा निकाल लागला. त्याने चाचणीत मिळालेले गुण आईला फोन करून सांगितले. त्यावेळी आईने ‘तू सांगितले त्यापेक्षा कमी गुण मिळाले’ असे म्हटले. त्यानंतर मल्हार जोशी याने हातातील फोन फेकून देत सातव्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.