जयंत पाटील हेच बळीचा बकरा

0
129

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – विधानपरिषदेची निवडणूक उद्या होणार आहे. त्यापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. भाजपचे पाच उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, भाजपची नेमकी रणनिती काय आहे? याबद्दल भाजपचे आमदार, माजी मंत्री संजय कुटे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी भाजपातील एका उमेदवाराची विकेट पडणार असा दावा केल्याने सत्ताधारी गोटात खळबळ आहे, तर दुसऱ्या बाजुने आता महाआघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांनाच बकरा केल्याचा गौप्यस्फोट भाजपने केल्याने उद्याच्या निवडणुकितील रंगत वाढली आहे.

‘आमदारांना काही कारणास्तव हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. ही विधानपरिषदेची निवडणुकीची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे चांगले आमदारही गोंधळतात. थोडीशी जरी चूक झाली तरी एक मत वाया जातं. एक मत वाया जाणं हे खूप कठीण असतं. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवून नीट मार्गदर्शन केले जाते.’, असं संजय कुटे यांनी सांगितले. तर भाजपचे नाहीतर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, याबद्दल काही शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर रोहित पवारांवर आमदारांचा विश्वास नव्हता म्हणून ते अजितदादांकडे गेले तर जयंत पाटलांना बळीचा बकरा गेला आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.