भोसरी, दि. ६ –
भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील आई आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या. ही घटना 29 जून रोजी सायंकाळी सहा वाजताच सुमारास टेल्को रोड, भोसरी येथे घडली.
समृद्धी सुनील वैरागर (वय 21, रा. भोसरी) आणि सविता सुनील वैरागर अशी जखमींची नावे आहेत. समृद्धी यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 12/एचडी 7252 क्रमांकाच्या ट्रक वरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची आई दुचाकीवरून टेल्को रोडने भोसरीकडे जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एक ट्रक आला. चालकाने उजव्या बाजूने येऊन निष्काळजीपणे डाव्या बाजूला ट्रक वळवला. त्यामुळे ट्रकची फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यामध्ये फिर्यादी आणि त्यांची आई जखमी झाल्या. अपघात झाल्यानंतर आरोपी ट्रक चालक पळून गेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.










































