शेअर मार्केटच्या आमिषाने पावणे सात लाखांची फसवणूक

0
76

दि ४ जुलै (पीसीबी ) – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत एका व्यक्तीची सहा लाख 71 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 19 फेब्रुवारी 2024 रोजी रहाटणी येथे घडली.

याप्रकरणी रहाटणी येथील 35 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करणवीर दिल्लोन, वनिता गोयल, एलीस अकाउंट व्यवस्थापक, प्रशांत तिरूमलसेटी (आरोपींचा संपूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सोशल मिडीयावर मेसेज करून त्यांना ट्रेडिंग शिकवण्याबाबत तसेच गुंतवणुकीवर अधिक नफा मिळविण्याबाबत मार्गदर्शन मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोन लिंक पाठवून त्यांना एका ग्रुपमध्ये जॉईन करण्यास भाग पाडले. त्यानंतर एक एप डाउनलोड करण्यास सांगून त्यावर पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपींनी सहा लाख 71 हजार 102 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.